ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरासाठी आणलेली वाघीण बेपत्ता, अधिकारी हादरले

ताडोबा येथून आणलेल्या वाघिणीवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी तिला सॅटेलाईट कॉलर जीपीएस लावण्यात आलं होत. दोन दिवस तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं. मात्र, त्यानंतर तिला लावण्यात आलेलं कॉलर जिपीएस जंगलात एकाच जागेवर दिसून येत होते.

Jitendra Zavar | Updated on: Apr 14, 2024 | 3:45 PM
1 / 5
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून नुकतीच एक वाघीण नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आली. व्याघ्रप्रकल्पातील क्षेत्रफळाच्या तुलनेत ताडोबातील वाघ मावेनासे झाल्यामुळे वाघिणीचे स्थलांतर केले गेले.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून नुकतीच एक वाघीण नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आली. व्याघ्रप्रकल्पातील क्षेत्रफळाच्या तुलनेत ताडोबातील वाघ मावेनासे झाल्यामुळे वाघिणीचे स्थलांतर केले गेले.

2 / 5

मे २०२३ मध्ये तडोबातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नागझिरा अभयारण्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. त्यातील एप्रिल २०२४ मध्ये एक वाघीण भंडारामधील नागझिरा अभयारण्यात सोडली गेली.

3 / 5

नागझिरी अभयारण्यात २० वाघांची क्षमता असूनही त्याठिकाणी वाघांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाघिणीचे स्थलांतर केले जात आहे. परंतु ती वाघीण बेपत्ता झाली आहे.

4 / 5

ताडोबा येथून आणलेल्या वाघिणीवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी तिला सॅटेलाईट कॉलर जीपीएस लावण्यात आलं होत. दोन दिवस तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं. मात्र, त्यानंतर तिला लावण्यात आलेलं कॉलर जिपीएस जंगलात एकाच जागेवर दिसून येत होते.

5 / 5

नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी सॅटेलाईट जीपीएस कॉलर नागझिरा अभयरण्यातील कक्ष क्रमांक 95 मध्ये जमिनीवर पडलेले आढळून आले. त्यामुळे नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us