Tirupati Temple : बापरे बाप! 121 किलो सोनं दान, किंमत तब्बल 160 कोटी, उद्योगपतीने का निर्णय घेतला?
देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती मंदिराला एका उद्योजकाने तब्बल 121 किलो सोनं दान केलं आहे. चेन्नईचे व्यावसायिक वर्धमान जैन यांनी हे दान केल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती मंदिराला एका उद्योजकाने तब्बल 121 किलो सोनं दान केलं आहे. चेन्नईचे व्यावसायिक वर्धमान जैन यांनी हे दान केल्याची माहिती समोर आली आहे. या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 160 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (फोटो सौजन्य- @tirupati_info)
वर्धमान जैन हे चेन्नईतील प्रसिद्ध उद्योजक असून त्यांचा व्यवसाय प्रामुख्याने हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, बीपीओ आणि ऑटोमेशन क्षेत्रात आहे. त्यांची कंपनी आरोग्य क्षेत्रातील संस्थांना तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवते. (फोटो सौजन्य- @tirupati_info)
26 नोव्हेंबर 2026 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत वर्धमान जैन यांनी हे दान केले. त्यांनी भगवान वेंकटेश्वरांसाठी सोन्याचे दागिने आणि मुकुट अर्पण केले आहेत. या भव्य दानामुळे धार्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो सौजन्य- @tirupati_info)
वर्धमान जैन यांनी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा वापर भगवान वेंकटेश्वरांच्या सजावटीसाठी केला जाणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी हे दागिने देवाच्या मूर्तीला परिधान केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य- @tirupati_info)
विशेष म्हणजे, वर्धमान जैन यांनी मंदिरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात दान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी मंदिराच्या देखभालीसह विविध आवश्यक कामांसाठी आर्थिक मदत केली आहे. परंतु आता केलेल्या या दानाची सगळीकडे विशेष चर्चा होतेय. (फोटो सौजन्य- @tirupati_info)