तितीक्षा तावडेनं दिलं आनंदाची बातमी; ‘दृश्यम’ फेम अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ

मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. तितीक्षा आणि दृश्यम 2 फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके एकमेकांना डेट करत आहेत.

| Updated on: Feb 09, 2024 | 10:53 AM
1 / 5
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'दृश्यम 2'मधील अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लग्न जाहीर केलं आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'दृश्यम 2'मधील अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लग्न जाहीर केलं आहे.

2 / 5

तितीक्षाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'त्याने मला डेटवर जाण्यासाठी विचारलं, ती डेट म्हणजे केळवण.' तितीक्षाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

3 / 5

सिद्धार्थ आणि तितीक्षाने याआधीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. तितीक्षाने नुकताच तिचा वाढदिवसुद्धा सिद्धार्थसोबत मिळून साजरा केला होता.

4 / 5

तितीक्षाने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित 'शाब्बाश मिठू' या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

5 / 5

दुसरीकडे सिद्धार्थ बोडकेनं 'तू अशी जवळी राहा' या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तो अजय देवगण आणि तब्बूच्या 'दृश्यम 2' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us