Todays Gold Rate Crash: ताई, माई, अक्का आनंदाची बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे. वाचा आजचा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीबाबत सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत होती. सोने आणि चांदीचे दर हे सतत घसरत होते. काल सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज पुन्हा दरात वाढ झाली आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
आज 25 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार 800 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 26 हजार 690 रुपयांवर आले आहेत.
तर दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरात 9 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपये झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस योग्य ठरू शकतो.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)