Todays Gold Rate: सर्वसामान्यांना खरेदी करता येणार! सोन्याचे भाव धाडकन आपटले, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. त्यामुळे आज जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? जाणून घ्या...

सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे प्रत्येक भारतीयाचा कल असतो. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत अनेकजण एक चांगली गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. पण सोने आणि चांदीच्या वाढत्या किंमतींमुळे खरेदी करणे थोडे कठीण झाले आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव काय आहे?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.
आज 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 52 हजार 440 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दर हे जीएसटीसह 2 लाख 30 हजार 720 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या पाच दिवसांपासून चांदीचे दर स्थिर होते. मात्र, आज दरात घसरण झाली आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)