Todays Gold Rate: बापरे! सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? वाचा
Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी भाव हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळाले. पण आज सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमती अस्थिर असल्याचे पाहायले मिळते. कधी भाव अचानक कमी होतात तर कधी अचानक वाढतात. आज सोने आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र समोर आले आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा मोठा फटका आहे.
24 तासात जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 955 रुपयांवर पोहोचले आहेत.
दुसरीकडे चांदीच्या दरात 2 हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 33 हजार 810 रुपये झाले आहेत. एकंदरीतच सोन्या चांदीच्या गेल्या आठ दिवसांपासून चढ उतार सुरू आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)