Auto News : पावरसह स्पीडचं जबरदस्त कॉम्बिनेशन! 20 लाखाच्या आत मिळणाऱ्या 5 बेस्ट परफॉर्मन्स कार

Auto News :ऑफिसला जाण्याचा किंवा लांब ड्राइव्हला जाण्याचा अनुभव तुम्हाला अजून रोमांचक बनवायचा आहे का?. आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात 20 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या कार्सबद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Jun 10, 2026 | 4:25 PM
1 / 5
फोक्सवॅगन वर्टस ही कार 2022 साली लॉन्च झाली. वेंटो सेडानची जागा या कारने घेतली. प्रतितास 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने ही कार पळू शकते. या कारने ओवरटेक करणं सोपं पडतं. या कारची किंमत 12.33 लाख रुपयापासून 22.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात दोन इंजिन ऑप्शन मिळतात. 1-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन. मॅनुअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे.

2 / 5

रेनो डस्टरने या वर्षाच्या सुरुवातीला दमदार टर्बो-पेट्रोल इंजिनसह पुनरागमन केलं आहे. डस्टर आपली मज़बूत राइड आणि हँडलिंगसाठी ओळखली जाते. भारतीय रस्त्यांच्या हिशोबाने ही एक परफेक्ट कार आहे. नव्या डस्टरमध्ये 1-लीटर आणि 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे. या कारची किंमत 12.09 लाख रुपयापासून 21.56 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

3 / 5

महिंद्रा बीई 6 मध्ये 59 केडब्ल्यूएच आणि 79 केडब्ल्यूएच बॅटरी पॅकचा ऑप्शन मिळतो. याची रेंज 683 किलोमीटर असल्याचा दावा करण्यात येतो. ही कार 231 पीएस पावर आणि 380 एनएम टॉर्क देते. 360 डिग्री कॅमरा, 7 एयरबॅग, हिल होल्ड असिस्ट आणि ईएससी सारखे फ़ीचर्स दिले आहेत. या कारची किंमत 20.67 लाख रुपयापासून 30.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

4 / 5

मारुति सुजुकी जिम्नीची कीमत 14.59 लाख रुपयापासून 17.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 6 एयरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल होल्ड असिस्ट (एचएचए), आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट आणि पार्किंग सेंसरसह रियर-व्यू कॅमरा दिला आहे.

5 / 5

हुंडई आय20 एन लाइनची किंमत 9.27 लाख रुपयापासून 11.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हुंडईने आय 20 एन लाइनला अजून स्पोर्टी लुक दिला आहे. सेफ्टीसाठी यात 6 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट आणि पार्किंग सेंसरसह रियर-व्यू कॅमरा दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us