प्रत्येक एपिसोडमध्ये रहस्याचा थरार, या 4 थ्रिलर सीरिज चुकवू नका; 9 च्या आसपास IMDb रेटिंग

OTT : या चारही सीरिजची कथा आणि मांडणी वेगवेगळी आहे. त्यामुळे माफिया ड्रामा, पोलिस तपास, गुन्हेगारी रहस्य किंवा डिटेक्टिव्ह स्टोरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांना यात पर्याय मिळू शकतात.

| Updated on: Sep 20, 2026 | 1:37 PM
1 / 5
क्राइम, मर्डर मिस्ट्री आणि रहस्यमय तपासाच्या कथा पाहायला आवडत असतील, तर OTT वर अनेक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहेत. काही सीरिज अशा आहेत ज्या केवळ कथेमुळेच नाही, तर दमदार अभिनय, गुंतागुंतीची पात्रं आणि सतत बदलणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.

क्राइम, मर्डर मिस्ट्री आणि रहस्यमय तपासाच्या कथा पाहायला आवडत असतील, तर OTT वर अनेक जबरदस्त पर्याय उपलब्ध आहेत. काही सीरिज अशा आहेत ज्या केवळ कथेमुळेच नाही, तर दमदार अभिनय, गुंतागुंतीची पात्रं आणि सतत बदलणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.

2 / 5

The Sopranos- या यादीत सर्वाधिक IMDb रेटिंग असलेली सीरिज म्हणजे 'द सोप्रानोस'. या अमेरिकन क्राइम ड्रामाचे एकूण सहा सिझन्स आहेत. डेव्हिड चेस यांनी तयार केलेल्या या सीरिजमध्ये जेम्स गंडोल्फिनी, एड फाल्को आणि इतर कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गुन्हेगारी जगत, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संघर्ष या मालिकेत पाहायला मिळतो. IMDb वर या सीरिजला 9.2 रेटिंग मिळाली आहे. ही सीरिज जिओ हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

3 / 5

True Detective- गुन्ह्यांचा तपास, गूढ रहस्य आणि पोलिसांसमोरील गुंतागुंतीची प्रकरणं पाहायची असतील तर 'ट्रू डिटेक्टिव्ह' हा पर्याय आहे. या सीरिजचे आतापर्यंत चार सिझन्स आले आहेत आणि पहिला सीझन 2014 मध्ये प्रदर्शित झाला. वुडी हॅरेल्सन, मॅथ्यू मॅकोनहे, मिशेल मोनाघन आणि महेर्शला अली यांसारखे कलाकार या सीरिजचा भाग आहेत. IMDb वर या सीरिजला 8.8 रेटिंग आहे. तो जिओ हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओवर पाहता येतो.

4 / 5

Fargo- क्राइमसोबत ब्लॅक कॉमेडी आणि वेगळ्या प्रकारचं कथानक पाहण्याची इच्छा असेल तर 'फार्गो' लक्षात ठेवण्यासारखी सीरिज आहे. या सीरिजचे पाच सिझन्स आहेत. मार्टिन फ्रीमॅन, बिली बॉब थॉर्नटन यांसारख्या कलाकारांनी यात काम केलं आहे. नोआ हॉली यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. IMDb वर या सीरिजला 8.8 रेटिंग मिळाली असून ती प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

5 / 5

Sherlock- डिटेक्टिव्ह स्टोरीज आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'शेरलॉक' हा लोकप्रिय पर्याय आहे. बेनेडिक्ट कंबरबॅच आणि मार्टिन फ्रीमॅन यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज 2010 मध्ये सुरू झाली. शेरलॉक होम्सच्या बुद्धिमत्तेने आणि वेगवेगळ्या रहस्यमय प्रकरणांच्या तपासाने ही कथा पुढे जाते. IMDb वर या मालिकेला 9 रेटिंग मिळाली असून ती प्राइमवर पाहता येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us