Solo Trip : परदेशात फिरायला जायचा प्लान करताय? सोलो ट्रॅव्हलसाठी 3 देश सर्वात बेस्ट
परदेशात फिरायला जायचा प्लान करण्याऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. परदेशात एकटे फिरायला जात असाल, तर तुमच्यासाठी तीन देश सर्वात बेस्ट आहेत. जाणून घ्या

सध्या परदेशात किंवा देशातही सोलो ट्रॅव्हल ट्रेंड निर्माण झाला आहे. तरुण-तरुणी बॅग घेत एकटेच प्रवासाला निघतात. त्यानंतर प्रवासातील अनुभव शेअर करतात.
सोलो ट्रॅव्हलर जयंत शर्मा यांनी तीन नावे सुचवले आहेत. त्यांनी जगातील तीन देशांची नावे सुचवली आहेत. यात पहिलं नाव जपान आहे.
सोलो ट्रॅव्हलर जयंत शर्माने जपान, व्हिएतनाम आणि थायलँड या तीन देशांची सुचवली आहेत. जपानमधील टोकियो, क्योटो, ओसाका, नारा, हाकोने या शहरात फिरण्याचा सल्ला दिला. या शहरातील मंदिर, डोंगराळ गावांचा अनुभव त्यांनी सांगितला. तेथील रामेन, सुशी, ताकोयाकी या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा सल्ला दिला.
व्हिएतनाम हे सोलो ट्रॅव्हलिंगसाठी चांगला देश आहे. जयंत शर्मा यांनी 15 हून अधिक दिवस या देशात प्रवास केला. येथील कॉफी संस्कृती अप्रतिम आहे. या देशात तुम्ही हा लाँग बे' या ठिकाणी आवर्जुन भेट द्या. तेथील खाद्यपदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
थायलंड देखील सोलो ट्रॅव्हलिंगसाठी चांगला देश आहे. थायलंडमध्ये रात्री हॉटेल हे फक्त 7 ते 8 डॉलरमध्ये मिळतात. तेथील जेवण देखील अप्रतिम आहे. या शहरात मंदिर, गजबजलेली शहरे, सूर्योदय सर्वांचं लक्ष वेधून घेतो.