
वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला दिसले. रात्री 9.12 सुरु झालेले हे सूर्यग्रहण 5 तास 10 मिनिटांनी संपले. हे संपूर्ण सूर्यग्रहण होते. यापूर्वी असे दुर्मिळ सूर्यग्रहण 54 वर्षांपूर्वी 1970 मध्ये दिसले होते.

अमेरिकेत पूर्ण सूर्य ग्रहण पाहिले गेले. त्याठिकाणी सूर्य ग्रहणा दरम्यान संपूर्ण अंधार झाला होता. सूर्यग्रहणामुळे उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये 8 एप्रिलला शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जगभरातील 54 देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण झाले.

सूर्य ग्रहण पाहण्यासाठी गुगलने लोकांना लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधाही दिली होती. घरात बसूनही युजर्सनी सूर्यग्रहणाच्या विहंगम दृश्याचा आनंद लुटला. सोमवारी झालेल्या सूर्य ग्रहणाचा भारतात कोणताही प्रभाव दिसला नाही, कारण ग्रहण सुरू झाले तेव्हा येथे रात्र झाली होती.

मेक्सिकोचे किनारपट्टीवरील माझाटलान हे उत्तर अमेरिकेतील पहिले ठिकाण होते जिथे हे सूर्यग्रहण पहिल्यांदा दिसले होते. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक विशेष चष्मा घालून डेक खुर्च्यांवर बसून सूर्यग्रहण पाहत असल्याचे दिसून आले.

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे जिथे चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये जातो. यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः अवरोधित होतो. अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये सूर्यग्रहणाच्या वेळी 400 जोडप्यांनी लग्न केले.