
दररोज थोडा तरी सराव करा... ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास येईल. रोज 15–20 मिनिटं इंग्रजी वाचन, लेखन, ऐकणं किंवा बोलल्याने आत्मविश्वास वाढतो. जो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

चुका झाल्या तरी घाबरुन जावू नका... चुका समजून घ्या आणि एकदा झालेली चून परत करु नका. चुका झाल्याशिवाय कोणतीच भाषा येत नाही. बोलताना किंवा लिहिताना चुका झाल्या तरी तो शिकण्याचाच भाग आहे.

दररोज नवीन शब्द शिका आणि तो शब्द कसा वापरायचा ते समजून घ्या... दररोज 5–10 नवीन शब्द शिका आणि ते वाक्यात वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे मोठा फायदा होईल.

इंग्रजी ऐकण्याची सवय लाव. भाषा शिकण्याच्या प्रवासातील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे... इंग्रजी गाणी, चित्रपट, बातम्या किंवा व्हिडिओ ऐकले तर उच्चार सुधारतील आणि तुम्हाला नव्या गोष्टी देखील शिकता येतील.

सुरु कधीही सोप्या वाक्यांपासून सुरुवात करा. ज्यामुळे तुम्हाला कोणतं वाक्य तयार करताना त्रास येणार नाही. अवघड व्याकरण आधी न शिकता, रोजच्या वापरातील साधी वाक्यं बोला.