हॉटेल मॅनेजरने माझ्यासोबत जे केलं ते आईला कळताच… अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. जेव्हा या प्रकाराबाबत आईला कळाले त्यानंतर काय घडले हे देखील अभिनेत्रीने सांगितले आहे.

| Updated on: Nov 03, 2026 | 8:47 AM
1 / 5
इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री या कायम त्यांच्या त्यांच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकताच. नुकताच एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकार सांगितला आहे. तिला एका हॉटेलमध्ये भयानक अनुभव आला होता. जेव्हा ही गोष्ट तिच्या आईला कळाली तेव्हा काय घडलं हे देखील अभिनेत्रीने सांगितले आहे.

2 / 5

देवों के देव महादेव या मालिकेत सुरुवातीला पार्वतीची भूमिका साकारणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदोरियाने एका पॉडकास्टमध्ये ही घटना सांगितली आहे. ती अगदी 10-11 वर्षांची असताना हा प्रकार घडला होता.

3 / 5

सोनारिका एका वसईमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तेथील मॅनेजरने तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. त्यावेळी ती इतकी लहान होती की तिच्यासोबत नेमकं काय घडलं हेच तिला कळालं नव्हतं.

4 / 5

अंधाऱ्या जागेचा फायदा घेत मॅनेजरने तिच्या छातीला स्पर्श केला होता. तिथे ती कुटुंबासोबत असतानाही तिला सुरक्षित वाटत नव्हते. काही वर्षांनंतर तिने तिचा अनुभव आईला सांगितला. तेव्हा आईने तिला विचारले की तिने इतकी वर्ष ही गोष्ट का सांगितली नाही.

5 / 5

पुढे सोनारिकाच्या आईने म्हटले की, जर तू तेव्हाच सांगितली असतीस पप्पांनी त्या व्यक्तीला तेव्हा शोधून काढलं असतं आणि चांगला चोप दिला असता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us