10 रुपयांच्या 2 नोटा तब्बल 12 लाखाला विकल्या, नेमकी विशेषता काय?

| Updated on: Sep 14, 2025 | 11:36 PM
1 / 5
जगात कधी काय होईल हे सांगता येत नाही. एखादी फार जुनी आणि पुरातन वस्तू आजघडीला लोक कोट्यवधी रुपये देऊन खरेदी करताना तुम्हाला पाहायला मिळतात. या वस्तूंचे तसे ऐतिहासिक महत्त्व असते. सध्या भारताच्या दोन 10 रुपयांच्या नोटांची जगभरात चर्चा होत आहे. (फोटो क्रेडिट-noonans)

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार दहा रुपयांच्या या दोन नोटांची एकूण किंमत 12 लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे. लोकांनी लाखोची बोली लावून या नोटा खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता या नोटा एवढ्या महत्त्वाच्या का आहेत, असे विचारले जात आहे. (फोटो क्रेडिट-noonans)

3 / 5
दहा रुपयांच्या या दोन नोटा अतिशय दुर्मिळ अशा आहेत. त्या 1918 सालच्या आहेत.  Noonans Mayfair या ऑक्शन हाऊसने त्या नोटा 24 मे 2024 रोजी बोलीसाठी ठेवल्या होत्या. या नोटांचे मूल्य फार तर दोन अडीच लाख असेल असे त्यावेळी वाटले होते. मात्र प्रत्यक्षात या दोन नोटांसाठी प्रत्येकी 6.90 आणि 5.80 रुपये मोजण्यात आले आहेत. (फोटो क्रेडिट-noonans)

4 / 5
या दोन नोटा 25 मे 1918 साली जारी करण्यात आल्या होत्या. 1918 सालीच SS Shirala हे ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे एक जहाज होते. हे जहाज तेव्हा लंडनहून मुंबईला येत होते. मात्र 2 जुलै 1918 साली समुद्रातील वादळामुळे ते जहाज बुडाले. (फोटो क्रेडिट-noonans)

5 / 5
त्यातील काही वस्तू समुद्रकिनारी वाहून आल्या. याच सामानात भारतीय चलन असलेल्या दोन दहा रुपयांच्या नोटा होत्या. या नोटा साधारण 100 वर्षे या पाण्यात होत्या असे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांना विशेष महत्त्व आहे. (फोटो क्रेडिट-noonans)