Karjat Bhima Shankar Forest : किती सुंदर आहे कर्जत भीमाशंकरचं जंगल, उद्धव ठाकरेंनी काढलेले फोटो एकदा बघाच

Karjat Bhima Shankar Forest : कर्जत येथील जंगल तोडीचा विषय चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांनी कर्जत भीमाशंकर येथे केलेल्या फोटोग्राफीचे फोटो शेयर केले आहेत.

| Updated on: Oct 31, 2026 | 1:05 PM
1 / 5
कर्जत येथील जंगल तोडीचा विषय चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांनी कर्जत भीमाशंकर येथे केलेल्या फोटोग्राफीचे फोटो शेयर केले आहेत. अभयअरण्याच्या लगत असलेल्या कोथळगडाची माहिती देत उद्धव ठाकरे यांनी स्वतः काढलेले फोटो केले शेयर.

कर्जत येथील जंगल तोडीचा विषय चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांनी कर्जत भीमाशंकर येथे केलेल्या फोटोग्राफीचे फोटो शेयर केले आहेत. अभयअरण्याच्या लगत असलेल्या कोथळगडाची माहिती देत उद्धव ठाकरे यांनी स्वतः काढलेले फोटो केले शेयर.

2 / 5

कर्जत-भीमाशंकरच्या हिरव्यागार पर्वतरांगेत उभा असलेला ऐतिहासिक कोथळीगड चर्चेत. पेठ गावाजवळील काळ्याकभिन्न कातळाचा बाणेदार सुळका म्हणजे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न असा उद्धव ठाकरे यांच्याकडून उल्लेख.

3 / 5

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या काळात असलेले महत्व उद्धव ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून नमूद केलेलं आहे. कोकण आणि मावळ प्रांतावर नजर ठेवण्यासाठी कोथळीगडाचे अधिक महत्त्व असल्याचा उद्धव ठाकरे यांच्याकडून उल्लेख.

4 / 5

कोलिंबा आणि सावळे घाटातील व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडाचा वापर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात टेहळणी आणि लष्करी हालचालींसाठी महत्त्वाची चौकी.

5 / 5

कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याच्या टाक्या आणि भैरोबाची गुहा हे गडाचे वैशिष्ट्य. या पोस्टमधील फोटो उद्धव ठाकरे यांनी काढले असून माहिती शिवसेनेचे उपनेते नितीन बानूगडे पाटील यांनी लिहली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us