IPL 2023 स्पर्धेत अनोख्या विक्रमांची नोंद, काय काय झालं ते वाचा एका क्लिकवर
IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धेत अनोख्या विक्रमांची नोंद झाली आहे. हे विक्रम वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. चला जाणून घेऊयात नेमकं काय काय झालं आहे ते

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. विशेष हे विक्रम अनोखे आणि वेगळे आहेत हे विशेष..(Photo : IPL/BCCI)

आयपीएल 2023 स्पर्धेत वेंकटेश अय्यर केकेआरसाठी शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. 15 वर्षानंतर कोलकात्याकडून त्याने शतक झळकावलं आहे. (Photo : IPL/BCCI)

कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलगा अर्जुनने पदार्पण केलं. सचिन आणि अर्जुन आयपीएलमद्ये खेळणारे पहिले पिता पुत्र ठरले. (Photo : IPL/BCCI)

सचिन आणि अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. सचिन आणि अर्जुन ही आयपीएलमधील पिता पुत्रांची पहिली जोडी आहे. (Photo : IPL/BCCI)

आयपीएल 2023 स्पर्धेत जॅनसेन ब्रदर्स हे दोघे आयपीएल खेळणारे जुळे भाऊ आहेत. असं आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. (Photo : IPL/BCCI)

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन सनराईजर्स हैदराबादकडून खेळतो. तर जुळा भाऊ डुआन जॅनसेन मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. (Photo : IPL/BCCI)

युसुफ-इरफान पठाण, हार्दीक-कृणाल पांड्या, मायकल-डेव्हिड हसी ही भाऊ आयपीएल खेळले आहेत. पण जुळे भाऊ खेळण्याचा माना जॅनसेन बंधुंना मिळाला. (Photo : IPL/BCCI)