Success Story : अपघातात पाय गेले, स्मृतीही गेली…तरी आज IAS, UPSC उत्तीर्ण होणाऱ्या अथिराची स्टोरी वाचून अभिमान वाटेल!

ऐन उमेदीच्या काळात अपघातामुळे व्हिल चेअरवर यावं लागलेल्या अथिरा आज क्लास वन अधिकारी झाली आहे. अपयश आल्यानंतर हार न मानता तिने खूप अभ्यास केला. आज ती आयएएस आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 9:13 PM
1 / 5
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाला जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. परंतु या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सध्या एका आगळ्या-वेगळ्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या एका विद्यार्थिनीची सगळीकडे चर्चा होत आहे.

2 / 5
यूपीएससी उत्तीर्ण केलेल्या या महिला विद्यार्थिनीचे नाव अथिरा सुगथन असे आहे. यूपीएससी 2025 सालच्या परीक्षेत अथिराला 483 वा रँक मिळाला आहे. ती आता क्लास वन अधिकारी झाली आहे. परंतु तिचा प्रवास खूपच कठीण आणि खडतर राहिलेला आहे.

3 / 5
 तिला ऐन उमेदीच्या काळात अपघातामुळे व्हिल चेअरवर दिवस काढावे लागले. सोबतच तिला अॅम्नेशिया या दुर्मिळ आजारालाही तोंड द्यावं लागलं. अॅम्नेशिया या आजारात माणसाची स्मरणशक्ती कमी होते. ती व्यक्ती सर्वकाही विसरायला लागते. अथिरा ही बीडीएस म्हणजेच दंतवैद्यक शास्त्राचा अभ्यास करत होती.

4 / 5
ती एक डेन्टिस्ट होणार होती. परंतु तिचा याच काळात अपघात झाला आणि तिला व्हिलचेअरशिवाय चालणे अशक्य झाले. कायमस्वरुपी व्हिलचेअरवरच दिवस काढावे लागणार हे समजूनही ती खचली नाही. तिने जिद्दीने अभ्यास केला.

5 / 5
यूपीएससीची परीक्षा देण्याचा तिचा हा चौथा प्रयत्न होता. अपयश आल्यानंतर तिने हार न मानता ती सतत प्रयत्न करत राहिली. परिणामी आज यश तिच्या पायाशी लोळण घेत आहे. ती आता आयएएस अधिकारी झाली आहे. केरळच्या अथिराचे देशभरात कौतुक केले जात आहे.

Follow Us