
आपल्या चित्रविचित्र फॅशन आणि तोकड्या कपड्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदची तब्येत बिघडली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत खुद्द तिने याबद्दलची माहिती दिली आहे.

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिचे ओठ सुजलेले दिसत आहेत. या फोटोवर तिने लिहिलंय, 'मी जेव्हा आजारी पडते, तेव्हा असंच होतं. माझे ओठ बदकासारखे सूजतात.'

'कोविड आहे की वायरल, हे आज समजेल', असंही तिने म्हटलंय. उर्फीला नुकतीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर ती आजारी पडली आहे.

दिग्दर्शक नीरज पांडेच्या ऑफिसमधून बोलत असल्याचं सांगत एका व्यक्तीने उर्फीला धमकी दिली. "तू ज्या प्रकारचे कपडे घालतेस, त्यासाठी तुला मरेपर्यंत चोपलं पाहिजे", असं तो तिला म्हणाल्याचं उर्फीने सांगितलं.

उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वाद ओढवून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली होती.