
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की अमेरिकेने इराणच्या तिन्ही अणुस्थळांना नष्ट केले आहे.

अमेरिकन सैन्याने इराणवर हवाई हल्ला केला तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह वॉर रूममध्ये उपस्थित होते आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते... असं देखील सांगण्यात येत आहे.

रविवारी सकाळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'सर्व अमेरिकन विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडले आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत. बॉम्ब फोर्डो नावाच्या जागेवर सर्वात जास्त बॉम्ब हल्ले करण्यात आले.'

पुढे अमेरिकन सैन्याचं कौतुक करत ट्रम्प म्हणाले, 'आमच्या महान योद्ध्यांना अभिनंदन! जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही. आता शांततेची वेळ आली आहे.' पण या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा देत म्हटले आहे की जर त्यांनी शांततेचा मार्ग निवडला नाही तर अमेरिकेची पुढील कारवाई पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असेल.