लाल स्वेटर, काळा गॉगल अन् हातात ड्रिंक; वैभव सूर्यवंशीचा स्टायलिश लूक पाहिलात का?
मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा वैभव सूर्यवंशी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असताना त्याने काही खास फोटो शेअर केले आहेत. त्याचा स्टायलिश लूक पाहून चाहतेही प्रभावित झाले आहेत.

लाल रंगाचा स्वेटर, डोळ्यांवर काळा गॉगल अन् हातात ड्रिंक... टीम इंडियाचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना भावला आहे.
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकून वैभवने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले होते. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
वयाच्या 12 व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने अल्पावधीत मोठी झेप घेतली. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर त्याला टीम इंडियातही संधी मिळाली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पार पडलेल्या टी-२० मालिकेदरम्यान १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी कमालीचा चर्चेत राहिला.
न्यूझीलंड दौऱ्यावर इशान किशन दुखापतग्रस्त झाल्यामुळे वैभवला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली. या दौऱ्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या १९ चेंडूत ४५ धावा ठोकून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. (सर्व फोटो सौजन्य- वैभव सूर्यवंशी इन्स्टाग्राम)