तुझ्या बापाने पैसे दिले नाही तर अख्ख्या खानदानाचा काटाच… शशांकने दिली होती धमकी; वैष्णवीच्या FIRमधील धक्कादायक खुलासा

वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होते आहेत.

| Updated on: May 21, 2025 | 9:26 PM
1 / 5
पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

2 / 5
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीत वैष्णवीचा पती शशांकने तिला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3 / 5
तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर, मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो' अशा शब्दांत शशांकने वैष्णवीला दमकावले होते असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

4 / 5
नंतर हा सर्व प्रकार वैष्णवीने तिच्या वडिलांना सांगितला होता. तिच्या वडिलांनी वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना जाब विचारला होता. त्यावर आम्ही भूकुम या ठिकाणचे प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असून आमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही दोन कोटी रुपये देवू शकत नाही, असे शशांकच्या घरचे म्हणाले होते.

5 / 5
तसेच, तुम्ही आमची बरोबरी करु शकत नाही असे म्हणत शशांकच्या कुटुंबीयांनी वैष्णवीच्या वडिलांनाअपमानास्पद वागणूक दिली होती, असा आरोपही वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.