ऋषि कपूरसोबत तिची जवळीक… मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव घेत वर्षा उसगांवकर यांनी थेट सांगितलं; ‘त्या’ वादाचा किस्सा काय?

वर्षा उसगांवकर आणि अश्विनी भावे एकाच वेळी इंडस्ट्रीत आल्या, पण दोघींमधील नातं कसं होतं? नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वर्षा यांनी अश्विनी भावे यांच्यासोबतचे अनुभव सांगितले. तसेच ऋषी कपूर यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दलही त्यांनी भाष्य केले.

| Updated on: Nov 12, 2026 | 8:32 PM
1 / 5
वर्षा उसगांवकर यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांना इंडस्ट्रीमध्ये कधी भांडणं किंवा वाद झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी अश्विनी भावे यांच्यासोबतचा अनुभव सांगितला.

वर्षा उसगांवकर यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांना इंडस्ट्रीमध्ये कधी भांडणं किंवा वाद झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी अश्विनी भावे यांच्यासोबतचा अनुभव सांगितला.

2 / 5

वर्षा म्हणाल्या, “नुकताच मी, निवेदिता आणि अश्विनी भावेने एक मुलाखत दिली. त्यावेळी मी तिला ही आठवण सांगितली. मी आणि अश्विनी भावे एकाच वेळी इंडस्ट्रीमध्ये आलो. अश्विनी भावे सुंदर दिसते आणि ती तेव्हाही सुंदर दिसायची.”

3 / 5

यानंतर त्यांनी हनिमून सिनेमातील आठवण सांगितली. या सिनेमात अश्विनीने त्यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने हीना सिनेमासाठी साइन केले.

4 / 5

ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांची चांगली मैत्री होती. मात्र, ऋषी कपूर यांच्याबरोबर कधी गट्टी जमली नसल्याचे वर्षा यांनी सांगितले. त्यांच्यात खूप दुरावा होता आणि त्यांना ऋषी कपूर खडूस वाटायचे. पुढे वर्षा उसगांकर ऋषि कपूर यांची अॅक्शन करून दाखवतात हेल्लो हाय... सी यु लेटर म्हणण्याची पद्धत पाहून मी वेगळाच अनुभव केला असं त्या म्हणाल्या.

5 / 5

मात्र, अश्विनी आणि ऋषी कपूर यांची मैत्री पाहून वर्षा यांना वेगळाच अनुभव आला. त्या म्हणाल्या, “पण, अश्विनी आणि ऋषी कपूरची मैत्री पाहून मी अनेकदा मनातल्या मनात म्हणायचे की यांची जास्तच मैत्री दिसते.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us