वसईत मित्राची बर्थडे पार्टी सुरू असताना पार्टीतून बाहेर बोलावून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहेत. एका सराईत गुन्हेगाराने हा निर्घृण खून केला आहे. सोडवायला गेलेल्या मित्रावरही त्याने चाकूने वार करून त्याला जखमी केले आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
वसई पश्चिम उमेळमान फाटा येथील पापडी MIDC मैदानात रविवारी रात्री साडेसात वाजता ही घटना घडली आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
आकाश मिलिंद पवार (वय 30) असे मयत तरुणाचे नाव आहे तर राहुल भुरकुंड असे जखमी तरुणाचे नाव आहे. मनीष रमेश पांडे (वय 37) असे आरोपीचे नाव असून, हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
या मारामारीत आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावर वसईच्या सर डी एम पेटिट महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर यांनी दिली. (फोटो सौजन्य- मेटा एआय)