एका घरात किती आरसे असावेत? कोणत्या दिशेला असावेत? जाणून घ्या

आरसा केवळ सजावटीचा भाग नसून तो घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आणतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास धन-समृद्धी वाढते, तर दक्षिण-पश्चिम दिशा टाळावी. तुटलेले आरसे त्वरित काढून टाका.

| Updated on: Dec 07, 2025 | 11:38 PM
1 / 8
घराला सुंदर आणि प्रशस्त लूक देण्यासाठी अनेकजण आरशाचा वापर करतात. पण वास्तुशास्त्रानुसार हा आरसा केवळ सजावटीचा भाग नसून तो घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा आणण्याचे एक शक्तिशाली माध्यम मानला जातो.

2 / 8
त्यामुळे जर तुम्हीही घरात आरसा लावण्याचा विचार करत असाल तर तो कोणत्या दिशेने लावावा, त्याचा आकार कसा असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका घरात किती आरसे असावेत, याबाबत वास्तू तज्ज्ञांनी काही महत्त्वाने काही नियम सांगितले आहेत.

3 / 8
वास्तूशास्त्रानुसार घरात आरसा लावण्यासाठी पूर्व आणि उत्तर या दोन दिशांची भिंत सर्वोत्तम मानली जाते. उत्तर दिशा ही धनाचा देवता कुबेर याची दिशा आहे. या दिशेला आरसा लावल्याने घरात धन-संपत्तीचा प्रवाह टिकून राहतो. तसेच आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात.

4 / 8
घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतींवर चुकूनही आरसा लावू नये. यामुळे कुटुंबात कलह आणि तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच बेडरुममध्ये आरसा लावणे टाळावे. जर लावला असेल, तर तो पलंगाच्या समोर नसावा. आरशात झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. रात्रीच्या वेळी आरसा झाकून ठेवावा.

5 / 8
मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच्या भिंतीवर आरसा नसावा, अन्यथा घरात येणारी सकारात्मक ऊर्जा लगेच बाहेर फेकली जाते. तुटलेला, तडकलेला, अस्पष्ट किंवा गंजलेला आरसा घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. तो त्वरित काढून टाकल्यास घरातली नकारात्मकता दूर होते.

6 / 8
तिजोरीमध्ये एक छोटा आरसा ठेवल्यास त्यात घरातल्या संपत्तीचे प्रतिबिंब दिसते, ज्यामुळे धन-संपत्तीत वाढ होते. तसेच डायनिंग हॉलमध्ये आरसा लावणे शुभ मानले जाते. यामुळे अन्न आणि समृद्धी दोन्ही गोष्टींची ऊर्जा दुप्पट होते.

7 / 8
वास्तुशास्त्रानुसार, घरात किती आरसे असावे, असे काही निश्चित बंधन नाही. संख्या कितीही असली तरी प्रत्येक आरसा योग्य दिशेला आणि साधारणपणे जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर लावलेला असावा.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)