झाडू ठेवण्याची पद्धत तुम्हाला करू शकते कंगाल; आजच बदला ही सवय!

बेडरूममध्ये झाडू ठेवल्याने आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक कलह वाढू शकतात. वास्तुशास्त्रानुसार झाडू कुठे आणि कसा ठेवावा, याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Apr 27, 2026 | 4:37 PM
1 / 6
आपल्या घरात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण तो कुठे ठेवायचा याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. अनेक जण रात्री किंवा सोयीसाठी बेडरूममध्ये झाडू ठेवतात, पण ही छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकते.

आपल्या घरात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, पण तो कुठे ठेवायचा याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. अनेक जण रात्री किंवा सोयीसाठी बेडरूममध्ये झाडू ठेवतात, पण ही छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकते.

2 / 6

बेडरूम ही पती-पत्नीच्या प्रेमाची जागा आहे. तिथे झाडू ठेवल्याने दोघांमध्ये विनाकारण भांडणे आणि तणाव वाढतो. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये झाडू ठेवल्याने घरात पैसा टिकत नाही. अनावश्यक खर्च वाढतात आणि आर्थिक प्रगती थांबते,

3 / 6

झाडूमुळे खोलीत नकारात्मक ऊर्जा येते, ज्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. यामुळे मानसिक शांतता लाभत नाही. नोकरी किंवा व्यवसायात वारंवार अडचणी येत असतील, तर त्याचे एक कारण बेडरूममधील झाडू असू शकतो.

4 / 6

वास्तुशास्त्रानुसार झाडू नेहमी घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. झाडू कधीही उभा करून ठेवू नका, तो नेहमी आडवा करून ठेवावा.

5 / 6

झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचे सहज लक्ष जाणार नाही. तो नेहमी लपवून ठेवणे चांगले असते.घरात सुख-समृद्धी हवी असेल, तर आजच तुमच्या बेडरूममधील झाडू योग्य जागी हलवा.

6 / 6

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us