घरात सतत भांडणे आणि पैशांची चणचण भासते? तुमची ही सवय असू शकते कारणीभूत

तुम्हीही पलंगावर किंवा उंबरठ्यावर बसून जेवता का? वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या ठिकाणी जेवल्याने घरात गरिबी आणि आजारपण येऊ शकते. सुख-समृद्धीसाठी जेवताना कोणत्या जागा टाळल्या पाहिजेत, ते सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Jun 11, 2026 | 1:46 PM
1 / 6
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत अनेकदा लोक वेळेअभावी किंवा स्वतःच्या सोयीनुसार घरात कुठेही बसून जेवतात. परंतु, भारतीय परंपरा आणि वास्तुशास्त्रानुसार, जेवण करणे हा केवळ भूक भागवण्याचा मार्ग नसून तो एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे जेवताना योग्य जागा, दिशा आणि आजूबाजूचे वातावरण याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत अनेकदा लोक वेळेअभावी किंवा स्वतःच्या सोयीनुसार घरात कुठेही बसून जेवतात. परंतु, भारतीय परंपरा आणि वास्तुशास्त्रानुसार, जेवण करणे हा केवळ भूक भागवण्याचा मार्ग नसून तो एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे जेवताना योग्य जागा, दिशा आणि आजूबाजूचे वातावरण याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

2 / 6

जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसून जेवलात तर घरात नकारात्मकता वाढून विविध समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार जेवताना कोणत्या जागा कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि कुठे जेवायला हवं याबद्दल जाणून घेऊया.

3 / 6

वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवणे ही सर्वात अशुभ सवयींपैकी एक मानली जाते. बेडवर अन्न सेवन केल्याने आरोग्यावर तर नकारात्मक परिणाम होतोच, शिवाय यामुळे घरात आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण वाढू लागतो. म्हणूनच नेहमी डायनिंग टेबलवर किंवा जमिनीवर चटई अंथरून निश्चित केलेल्या जागेतच जेवावे.

4 / 6

घरातील अस्वच्छ किंवा पसारा असलेल्या ठिकाणी बसून कधीही जेवू नये. अशा जागांवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो, ज्यामुळे तुमच्या मनावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नेहमी स्वच्छ, प्रकाशमय आणि शांत वातावरणातच अन्न ग्रहण करावे.

5 / 6

काही जणांना स्वयंपाकघरात गॅस ओट्याशेजारीच बसून जेवण्याची सवय असते, पण वास्तू नुसार हे अयोग्य आहे. गॅस बर्नरजवळ बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण तणाव, वाद आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्वयंपाकाची जागा आणि जेवणाची जागा नेहमी वेगळी असावी.

6 / 6

घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा उंबरठ्यावर बसून जेवणे पूर्णपणे टाळावे. असे केल्याने घरातील सुख-समृद्धी निघून जाते आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. थोडक्यात काय तर, अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी नेहमी शांत, स्वच्छ आणि सुव्यवस्थित जागेची निवड करूनच जेवण करावे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us