घराच्या मुख्य दरवाजावर काढा हे शुभ चिन्ह; काही दिवसांतच चमकेल नशीब
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक, ओम, शुभ-लाभ आणि लक्ष्मी पावले यांसारखी शुभ चिन्हे काढल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कशी येते ते जाणून घ्या.

वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जेच्या प्रवाहासाठी मुख्य प्रवेशद्वार हा सर्वात महत्त्वाचा स्रोत मानला जातो. जर घराच्या मुख्य दरवाजाची सजावट वास्तु तत्त्वांनुसार केली, तर घराचे एकूण वातावरण मोठ्या प्रमाणात सकारात्मक राहू शकते. मुख्य प्रवेशद्वारावर काढलेली काही शुभ चिन्हे घरात आनंद, शांतता आणि समृद्धी घेऊन येतात. आज आपण अशा ४ शुभ चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुमच्या घरात सकारात्मकता आणू शकतात.

स्वस्तिक चिन्ह - वास्तुशास्त्रानुसार, मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह काढणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हे सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढल्याने घराची पवित्रता आणि शुद्धता टिकून राहते. याच कारणामुळे अनेक लोक विशेष प्रसंगी आणि सणांच्या वेळी मुख्य दारावर स्वस्तिक आवर्जून काढतात.

ओम चिन्ह - हिंदू धर्मात ओम हे सर्वात पवित्र चिन्हांपैकी एक मानले जाते. वास्तूच्या तत्त्वांनुसार, मुख्य प्रवेशद्वारावर ओम चिन्ह काढल्याने किंवा त्याचे स्टिकर लावल्याने घरातील सकारात्मकता वाढते. या प्रथेमुळे घरात शांततापूर्ण वातावरण निर्माण होते. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मानसिक आरोग्यालाही फायदा होतो.

शुभ-लाभ - मुख्य प्रवेशद्वारावर शुभ-लाभ लिहिण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. वास्तूशास्त्रानुसार, हा शब्दसमूह प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. घराच्या बाहेरील बाजूस हे लिहिल्याने शुभ घटना लवकर घडतात. त्यामुळे घरात समृद्धी येते. तसेच, या प्रतीकातून निर्माण होणारी ऊर्जा कुटुंबातील सदस्यांना यशाच्या मार्गावर नेण्यास मदत करते.

देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे - मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे हे घरात ऐश्वर्य आणि सुदैवाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. मात्र, हे ठसे काढताना ते घरात प्रवेश करताना म्हणजे आत येताना दिसतील अशा पद्धतीने काढावेत. या प्रथेमुळे घरात धन, आनंद आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)