
घर खरेदी करताना आपल्याकडे वास्तूशास्त्राचे नियम पाळले जातात. घरात देवघर कुठे असावं, बेडरूम कशी असावी यासाठी वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत. हे नियम पाळले तर घरात शुख-शांती नांदते असे म्हटले जाते.

घरातील किचनला वास्तूशास्त्रात फार महत्त्व आहे. किचन म्हणजे फक्त चार भिंतीची एक खोली नसते. किचन हे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, आनंद यांच्या उर्जेचे केंद्र असते. त्यामुळेच किचन बांधताना काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे किचनमध्ये टाईल्स लावताना काही बाबी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.

तुमच्या किचनमध्ये तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर काळ्या आणि गडद रंगाच्या टाईल्स वापरणे टाळावे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार अशा प्रकारच्या टाईल्समुळे किचनमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परिणामी घरात चिडचिड, भांडण अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

किचनमध्ये तुटलेल्या, भेगा पडलेल्या टाईल्स वापरून नयेत. किचनमध्ये अशा टाईल्स लावण्यात आलेल्या असतील तर त्या काढाव्यात. तुटलेल्या टाईल्स किचनमध्ये लावल्यास घरात वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे किचनमध्ये चांगल्या आणि न फुटलेल्या टाईल्स लावाव्यात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.