
फोर्ट, मुंबई येथील ऐतिहासिक 'दि मॅजेस्टिक आमदार निवासा'च्या नुतनीकरण कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झाले.

या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील, रविंद चव्हाण, विधानसभेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधीमंडळाचे प्रधान सचिव आदींसह वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘दि मॅजेस्टिक’ या 'ग्रेड 2ए हेरिटेज' जुन्या वास्तूचे नुतनीकरण केले जात आहे. मूळ वास्तूचे सौंदर्य कायम ठेवून आधुनिक सोयी सुविधा असणाऱ्या नवीन आरखड्यानुसार या वास्तूचे नुतनीकरण होणार आहे.

दिमॅजेस्टिक महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदारनिवास वास्तू नूतनीकरणाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस