राजवाडे घराण्याचा भव्य विवाहसोहळा; ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये 11 दिवस जल्लोष

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचं गोव्यात शूटिंग सुरू आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Oct 29, 2025 | 1:32 PM
1 / 5
‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत सध्या राजवाडे घराण्याचा लग्नसोहळा पहायला मिळतोय. हा विवाहसोहळा मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण करणार आहे.

2 / 5
मुहूर्त ठरलाय, तयारी जोरात सुरू आहे. 29 ऑक्टोबरपासून ते 11 नोव्हेंबरपर्यंत हा जल्लोष रंगणार असून, राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहेत.

3 / 5
गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मुहूर्तमेढ, मेहेंदी, चुडा, हळद, सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाहसोहळा.. हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

4 / 5
कार्यक्रमाचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे - 29 ऑक्टोबर: मुहूर्तमेढ, 30 आणि 31 ऑक्टोबर: मेहेंदी, 1 आणि 2 नोव्हेंबर: चुडा, 5 आणि 6 नोव्हेंबर: हळद, 7 नोव्हेंबर: सीमांत पूजन आणि 10 आणि 11 नोव्हेंबर: अविस्मरणीय विवाह सोहळा.

5 / 5
परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा मिलाप असलेला हा विवाह सोहळा प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.