
'माझा होशील ना' या मालिकेत आदित्यची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विराजस कुलकर्णी याच्या आयुष्यात खऱ्या 'सई'ची एंट्री झाल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

विराजस आणि मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे चर्चेत आहे.

या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली ती या दोघांच्या एकत्र शॉपिंग फोटोंमुळे!

नुकताच अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळ्यात देखील शिवानी आणि विराजसने एकाच थीमचे कपडे परिधान केले होते.

इतकेच नव्हे तर, त्या दोघांनी खास फोटोशूट देखील केले आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळे ही सध्या 'सांग तू आहेस का?' या मालिकेत मुख्य भूमिका सकारात आहे. या आधीही ती अनेक मालिकांमध्ये झळकली होती.