विसापूर गडाच्या आडवाटेला आढळलं प्राचीन भुयार, रुंदी आणि उंची पाहून अनेक प्रश्न उपस्थित

महाराष्ट्राला आणि भारताला खरोखरच अत्यंत गौरवशाली आणि समृद्ध इतिहास लाभला आहे. सांगायचं झालं तर, अथांग गडकिल्ले भारतात आहे. पण आता विसापूर गडाच्या आडवाटेला भुयार आढळलं आहे. भटकंती करताना "सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला" भुयारीचा शोध लागला.

| Updated on: May 22, 2026 | 2:03 PM
1 / 5
मावळ तालुक्यातील किल्ले विसापूरच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेल्या एका अपरिचित असं प्राचीन भुयार आढळलं आहे. भटकंती करताना मावळातील दुर्ग- संवर्धन करणाऱ्या "सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला" भुयार आढळलं आहे. हे भुयार कोरीव असून नेमकं कशासाठी खोदलं गेलं असेल? कोणी खोदलं असेल? असं कुतहूल निर्माण करणारं आहे.

2 / 5
 प्राचीन भुयार  इतिहास अभ्यासकांना संशोधन करण्यासाठी मोठं पर्वणी ठरणारं आहे. मावळातील विसापूर गडाच्या पायथ्यालगत असलेल्या मालेवाडी याठिकाणाहून दुर्गसेवक हे आडवाटेने विसापूर गडावर जात असताना त्यांना हे प्राचीन आणि अपरिचित भुयार आढळलं.

3 / 5
आतमध्ये गेल्यावर सुरवातीला हे भुयार लांब त्यानंतर खोल आणि मग पूढे सरळ त्यानंतर पुन्हा खोल आणि डाव्या आणि उजव्या बाजूला गेलेलं आढळलं. सध्या भुयारीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

4 / 5
हे भुयार पाण्याच्या शोधासाठी किंवा आतमध्ये ध्यानधरणेसाठी बनवलं गेलं असेल का? नेमकं हे कोणत्या काळातील असावं? असे अनेक प्रश्न हे भुयार पाहून डोळ्यासमोर उभे राहत आहे. या भुयाराचं खोदकाम करताना वापरले गेलेल्या छिन्नी हातोड्याच्या खुना स्पष्ट दिसतात.

5 / 5
या भुयाराची रुंदी आणि उंची 3 बाय 3 फूट असून ते 50 फूट लांब चौकोनी आकाराचे कोरीव आहे. पुढे हे भुयार खालच्या बाजूला 5 फूट खोल असून उजव्या बाजूने पुन्हा 6 फूट लांब आहे. तर पुढे ते डाव्या बाजूला 12 फूट लांब आहे. पुढे हे भुयार 3 फुट खोल असून 4 फुट लांब आहे. आणि शेवटला दोन्हीही बाजूला 10-10 फुट लांब आहे. भुयारात पाणी आणि चिखल आहे.

Follow Us