अक्रोड आणि पिस्ता…झाडांवर कसे दिसतात हे नट्स, पाहा त्यांचे फोटो…
बदाम, अक्रोड आणि पिस्ता तुम्ही खूप खाल्ला असेल मात्र, ही फळे झाडांवर नेमकी कशी दिसतात. तुम्ही या नट्सना प्रत्यक्षात झाडांवर लगडलेले अपवादात्मक पाहिले असेल. चला तर या लेखात पाहूयात मार्केटमधून घरापर्यंत पोहचलेले हे नट्स नेमके झाडांवर कसे दिसतात..

बदाम खूप फायदेमंद मानले जातात. पिस्ते आणि अक्रोड अशा भागात उगवले जातात जेथे हवामान थंड असते आणि उष्णताही असते. डोंगराळ भागात हे ड्रायफ्रुट्स पिकतात. बदामाचे झाड हे आड्र म्हणजे पिच फॅमिलीचे असते. या झाडाला Prunus dulcis म्हणतात.हे झाड १३ ते ३३ फूटापर्यंत असू शकते. याच्या शाखा पसरलेल्या असतात. आपण जे बदाम खातो ते वास्तविक बिया असता. याच्या वरील फळ मोठे असते.

अक्रोड म्हणजे वॉलनटच्या झाडाला शास्रीय भाषेत जुग्लान्स रेगिया (Juglans regia) म्हटले जाते. हे खूप उंच असते. आणि त्याचा पसाराही मोठा असतो. या फळाला स्टोन फ्रुटच्या नावाने ओळखले जाते. याच्या आत बी असते. ज्याचा गर आपण खातो. या अक्रोडच्या झाडाचे आयुर्मान मोठे असते. ते १०० वर्षे देखील जगू शकते.झाड लावल्यानंतर ५ ते ७ वर्षांनी फळधारणा होऊ लागते.

भुईमुगाच्या शेंगा हिवाळ्यात येतात. ज्यांना गरीबांचे बदाम देखील म्हटले जाते. प्रोटीनने भरपूर असलेले पीनट्स हे झाडावर लागत नाहीत. तर जमीनीच्या आत या भुईमुगाच्या शेंगा येतात. याचे वनस्पती नाव Arachis hypogaea आहे. ही रोपटी वाटाणे आणि बीन्सच्या कुटुंबातील आहेत. हे रोपटी एक फुटापर्यंत वाढतात आणि जमीनीवर पसरतात.

काजूचे झाड हे सदाबहार फळ देते. उष्णकटीबंधीय प्रदेशात हे येते. काजूचे झाड हे मुळात ब्राझील येथील आहे. या झाडाची लांबी सुमारे ४६ फूटापर्यंत असू शकते. या झाडावर छोटी आणि हलकी सफेद फुल गुच्छाच्या स्वरुपात होते. त्यानंतर फळे येतात. ज्यांचा आकार पेर सारखा असतो. जेव्हा फळे पिकतात तेव्हा ते झाडांवरुन पडतात.त्यानंतर नट्स वेगळे होतात आणि त्यांना सुखवून काजू तयार होतात.

पिस्ता वेग- वेगळ्या डेझर्ट्स पासून आईस्क्रीमपर्यंत खूप वापरला जातो. पिस्त्याचा स्वाद अक्रोड सारखाच असतो. इराण हा जगातील सर्वाधिक पिस्ता पिकवणारा देश आहे. याचे झाड ३० ते ३३ फूटांचे असते. यावर बदामासारखेच पिस्त्याची फळे लागलेली असता.त्याच्या बिया म्हणजे खरे पिस्ते असतात.