Boost your Immune System : रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे?, तर ‘या’ फळांचं सेवन करा…

| Updated on: Apr 10, 2021 | 11:40 AM

आता कोरोना डोकं वर काढतोय. अशा परिस्थितीत आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. (Want to boost your immune system ?, then consume this fruit)

1 / 5
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. त्यात आता कोरोना डोकं वर काढतोय. अशा परिस्थितीत आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आणि आपल्या शरिराची इमुन सिस्टिम स्ट्राँग करणं जास्त गरजेचं आहे.

2 / 5
कलिंगडच्या बियांमध्ये लपलाय आरोग्यदायी खजिना

3 / 5
किवी : किवी फळ या दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाले आहे आणि त्याला भारतातही जास्त मागणी आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे. व्हिटामिन सी व्यतिरिक्त व्हिटामिन के, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि आहारातील फायबर देखील किवीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त किवी अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून केवळ प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर एकूण आरोग्यासाठी देखील किवी खूप फायदेशीर आहे.

4 / 5
स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीला बर्‍याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे. 1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त त्यात हेल्दी फोलेट आणि अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ती नैसर्गिक पद्धतीने आपले दात पांढरे करण्यात मदत करते.

5 / 5
आंबा : आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.