वॉशिंग मशिनमध्ये एकावेळी किती कपडे टाकावेत? एक चूक अन् होईल नुकसान

वॉशिंग मशिनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे टाकल्याने मोटर खराब होऊ शकते. ६ ते १० किलो क्षमतेच्या मशिनमध्ये नेमके किती कपडे धुवावेत आणि मशिनचे आयुष्य कसे वाढवावे, याची सविस्तर माहिती वाचा.

| Updated on: Apr 28, 2026 | 3:00 PM
1 / 6
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कपडे धुण्यासाठी बहुतेक घरांमध्ये वॉशिंग मशिनचा वापर केला जातो. मात्र, मशिनमध्ये एका वेळी नेमके किती कपडे लोड करावेत, याबद्दल आजही अनेकांमध्ये संभ्रम असतो.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कपडे धुण्यासाठी बहुतेक घरांमध्ये वॉशिंग मशिनचा वापर केला जातो. मात्र, मशिनमध्ये एका वेळी नेमके किती कपडे लोड करावेत, याबद्दल आजही अनेकांमध्ये संभ्रम असतो.

2 / 6

वॉशिंग मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे टाकल्यास कपडे तर नीट स्वच्छ होत नाहीतच. पण यामुळे मशीनच्या मोटरवर ताण पडून ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या वॉशिंग मशिनची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि कपड्यांच्या उत्तम स्वच्छतेसाठी मशिनच्या वजनानुसार कपडे टाकणं गरजेचे आहे.

3 / 6

जर तुमची मशिन ६ ते ६.५ किलो क्षमतेची असेल, तर त्यात एका वेळी साधारणपणे २० पेक्षा जास्त कपडे धुणे टाळावे. तसेच जर तुमची मशिन ६.५ ते ७ किलो असेल तर ही मशिन मध्यम कुटुंबासाठी उत्तम असते. यामध्ये तुम्ही साधारण ३० ते ३५ कपडे सहज धुवू शकता.

4 / 6

ज्यांची मशिन ७ ते ८ किलो क्षमतेची आहे, त्यांना एका वेळी सुमारे ४० कपडे धुणे शक्य होते. मोठ्या आकाराच्या १० किलोच्या मशिनमध्ये तुम्ही अंदाजे ५० कपडे एकाच वेळी लोड करू शकता.

5 / 6

मशिनमध्ये कपडे टाकताना ते खूप गच्च भरू नयेत. कपड्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात. त्यामुळे मशिनच्या ड्रममध्ये थोडी जागा रिकामी ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.

6 / 6

नेहमी जड कपडे म्हणजेच जीन्स, जॅकेट आणि हलके कपडे म्हणज टी-शर्ट, रुमाल यांचे मिश्रण करून धुवावेत. फक्त जड कपडे एकाच वेळी धुतल्यास फिरताना ड्रमचे संतुलन बिघडून आवाज येऊ शकतो, जो मशीनच्या बेअरिंगसाठी घातक ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us