
गडचिरोली जिल्ह्यातील आरक्षित जंगलाला अज्ञातांनी आग लावल्यानं मोठं नुकसान झालंय.

असरअली वनपरिक्षेत्र अंतर्गत असरअली पासून पातगुडमपर्यंत रिझर्व फॉरेस्ट प्रतिबंधित क्षेत्र जंगलासाठी ओळखला जातो.

या भागात मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन आदिवासी करीत असतात.

तेंदू संकलनाच्या तोंडावर जंगलात अज्ञात व्यक्तींनी आग लावली आहे.

या आगीमुळे जंगलात असलेले तेंदू वृक्षांचं मोठं नुकसान झालं आहे.

सोमवारी सायंकाळी ही आग जंगलाच्या चारही बाजूला पसरली.