
आयरा खानने तिचा 25 वाढदिवस वडील आमिर खान आणि आई रीना दत्ता यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा केला. मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या सोबत पूलपार्टी करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आयराच्या वाढदिवसाला आई-वडिलांसोबत बॉयफ्रेंड नुपूर शिखर उपस्थित होता. आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरनेही तिचे फोटो शेअर तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आयरा सोबतच स्विमिंग पूलमधील रोमान्टिक अंदाजातील फोटो नुपूरने शेअर केला आहे.

बिकिनी सूटमध्ये स्विमिंग टॅंकच्या ठिकाणी आयरा खानचे केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी बिकिनीवरून आयरा, आमीर खानला ट्रोल करण्यात आले आहे.

आयराच्या वाढदिवसाला आयोजित करण्यात आलेल्या पूल पार्टीमध्ये मित्र-मैत्रिणीही खूप एंजॉय करताना दिसून येत आहेत. याचबरोबर आमीर खानचा मुलगा आजादही सहभागी झाला होता.