Weather Update : राज्यातील हवामानात मोठा बदल, दुहेरी संकट, रात्री..
Weather Update : राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुढील काही दिवसात हवामान पुन्हा बदलेल. उत्तरेकडून थंडे वारे वाहत आहे.

राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. गारठा कायम असला तरीही किमान तापमानात वाढ होताना दिसत आहे. आज 28 नोव्हेंबर 2026 रोजी किमान तापमानात घट राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामानात चढउतार होईल.
गुजरात परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रापासून उत्तर गुजरातपर्यंत 1.5 किलोमीटर हवेचीा कमी दाबाचा पट्टा तयार झाला.
राज्यात ढगाळ वातावरण तयार होत असताना किमान तापमानात वाढ होत आहे. धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. निफाड गहू संशोधन केंद्रात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
गोंदिया येथे 13.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूर येथे 13.4 आणि नाशिक येथे 14.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तरेकडून थंडी वारे वाहत आहे. राज्यात तापमानात चढउतार होताना दिसत आहे.
पुढील काही दिवसात राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात सतत हवामान बदलत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.