
घरात पाय ठेवला की तुम्हाला सर्वात अगोदर जी वस्तू दिसते, त्यानुसारच मेंदू, शरीर प्रतिक्रिया देतं. त्यामुळेच वास्तूशास्त्रात घराच्या मुख्य द्वाराला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात मुख्य दरवाजाला उर्जेचे द्वार म्हटले जाते.

तुमच्या घरात जेव्हा कधी पाहुणा येतो, तेव्हा तो घराच्या भितींवर काय काय लावलेले आहे, हेच अगोदर पाहतो. त्यामुळेच तुमच्या घरातील पेंटिंग घरातील उर्जेवर प्रभाव पाडते. हा प्रभाव सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो.

घरात कोणतेही पेंटिंग लावण्यापूर्वी त्या पेंटिंगमुळे तुमच्यावर, कुटुंबातील सदस्यांवर तसेच घरावरही पडणारे परिणाम जाणून घेतले पाहिजेत. त्यामुळेच पेंटिंगची निवड खूपच काळजीपूर्वक करावी. घराच्या प्रवेशद्वारावर असणारे पेंटिंग हे अल्हाददायक वाटणारे असावे.

हे पेंटिंग हलक्या रंगाचे असावे. त्यात मोकळे आकाश असावे. हिरवळ, शांतता दिसायला हवी. घराच्या प्रवेशद्वाराजवळ अशा प्रकारचे पेंटिंग लावल्यास घरात सकारात्मक उर्जा नांदते. तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात. घराच्या इतरही भागात अशाच प्रकारचे पेंटिंग लावावे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.