
सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. अशात तुमचे लाडके कलाकार यावेळेत काय करताय याची तुम्हालाही उत्सुकता असेलच. तर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या जिवलग मित्र- मैत्रिणींसोबत वेळ घालवतेय.

तर संजय कपूर यांची मुलगी अर्थात सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत असलेली शनाया कपूर घरीच आपला वेळ घालवत आहे. नुकतंच शनायानं बाथरुम सेल्फी शेअर केली आहे.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरनंसुद्धा नुकतंच हा फोटो शेअर केला आहे.

अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे सध्या जून्या आठवणींमध्ये रमलेली पाहायला मिळाली. तिनं तिचे एका शूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननं नुकतंच हा हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तर बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या घरीच आपला वेळ घालवतेय. रोहनप्रीतसोबत तिनं अनेक फोटो शेअर केले आहेत.