
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव भारतात चांगलाच वाढतो आहे. सोनं कधीच दीड लाखांच्या पुढे गेले आहे. चांदीचा भावही सोन्यापेक्षा जास्त गतीने वाढतो आहे. असे असतानाच आता भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात काय स्थिती आहे ते जाणून घेऊ या...

भारताप्रमाणेच पाकिस्तानातही सोने आणि चांदीचा भाव वाढत आहे. पाकिस्तानची कमकुवत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई याचा फटका सोने आणि चांदीला बसत आहे. हो दोन्ही धातू चांगलेच भाव खात आहेत. त्यामुळे पाकिस्तानात सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

पाकिस्तानात 6 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकावर गेला. तेथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 44,219 ते 45,011 पाकिस्तानी रुपया प्रति ग्रॅमवर पोहोचला. पाकिस्तानात एक तोळा सोन्याचा भाव तब्बल 5,15,000 ते 5,19,000 पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला आहे.

पाकिस्तानात 22 कॅरेट सोन्याचा भाव 40,534 ते 41,257 पाकिस्तानी रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. कराची, लाहोर, इस्लामाबाद यासारख्या बड्या शहरांत सोन्याचा भाव साधारण सारखाच आहे. वरील आकडे पाहता पाकिस्तानात सोन्याचा भाव भारताच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे समजते.

पाकिस्तानात गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सोन्याची खरेदी करणे खूप कठीण आहे. सोन्यासोबतच पाकिस्तानात चांदीदेखील महागते आहे. पाकिस्तानात चांदीचा भाव 12,024 रुपये प्रति तोळा आणि 1,031 पाकिस्तानी रुपये प्रति ग्रॅम आहे.