
हिंदू धर्मात लग्न सोहळ्यादरम्यान अनेक विधी पार पाडले जातात. खरं तर विवाह म्हणजे एक जल्लोषच असतो. विवाहाच्या अगोदर दोन दिवस आणि विवाहानंतर दोन दिवस उत्सवाचा आणि उत्साहाचं वातावरण असतं. या काळात सर्व विधी पार पाडून वधू-वर एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेतात. पण या विवाह सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग हा नवरदेवाची वरात हा असतो. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

आजकाल नवरदेवाची वरात मोठ्या थाटात काढली जाते. नवरदेवाला घोड्यावर बसवून त्याची एका प्रकारे मिरवणूकच काढली जाते. त्याच्यापुढे ढोल-ताशांचा गजर असतो. नवरदेव घोड्यावर थाटात बसून वरातीत मिरवत असतो. पण याच वरातीचे नेमके महत्त्व काय आहे? हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे वरात का काढतात, हे जाणून घेऊ या..(सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

वरातीत नवरदेव विवाहस्थळी जाण्यासाठी मिरवणूक काढली जाते. याला संस्कृतमध्ये वरयात्रा म्हटले जाते. नवरदेव आपल्या होणाऱ्या बायकोसोबत जीवनाची एक नवी यात्रा सुरू करत आहे, असे त्याचा अर्थ होतो. शास्त्रानुसार वरात फक्त एक उत्सव नसतो. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

वरात हा दोन कुटुंबांसाठी एक शुभ प्रसंग असतो. वरातीदरम्यान छोटे, छोटे विधी पार पाडले जातात. हे विधी म्हणजे दोन कुटुंबं एकत्र येत आहेत, याचं प्रतिबिंब असतं. वरात आल्यानंतर नवरदेवाचे स्वागत केले जाते. यातून त्याच्यावर एक नवी जबाबदारी पडत आहे, हेदेखील सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो. (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)

परंतु आजकाल वरात म्हणजे एक फक्त डान्स करायचा अशी समजूत झाली आहे. नवरदेवाचे मित्र वरातीत मद्यप्राशन करून डान्स करतानाही दिसते. परंतु हे चुकीचे आहे. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.) (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)