America Facts : तुम्हाला अमेरिकेत 1 एकर शेती घ्यायची असेल तर किती रुपये लागतील? किंमत वाचून 99 टक्के लोक होतील चकित!
आजघडीला लाखो भारतीय अमेरिकेत वास्तव्यास आहेत. अमेरिकेत जाऊन भारतीयांनी तेथील संस्कृती आत्मसात केलीय. काही भारतीय तर अमेरिकेत जाऊन शेती करतात.

अमेरिका या देशाची सर्वांनाच भुरळ आहे. अमेरिकेतील नागरिक कसे राहतात, काय खातात, याची अनेकांना उत्सुकता असते. तेथील जीवनशैलीबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे असते.
आजघडीला लाखो भारतीय अमेरिकेत वास्तव्यास आहेत. अमेरिकेत जाऊन भारतीयांनी तेथील संस्कृती आत्मसात केलीय. काही भारतीय तर अमेरिकेत जाऊन शेती करतात.
दरम्यान, अमेरिकेत अनेक गोष्टी प्रचंड महाग आहेत, अशी धारणा आहे. त्यामुळेच अमेरिकेतील शेतजमीनही खूपच महाग असल्याचा अंदाज लावला जातो. त्यामुळे अमेरिकेतील एक एकर शेतीची किंमत काय ते जाणून घेऊ या..
अमेरिकेत चांगले पीक येईल अशा सुपिक शेतजमिनीचा भाव 5 हजार ते 10 हजार डॉलर्स प्रति एकर आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास अमेरिकेतील एक एकर शेतजमिनीचा भाव साधारणपणे पाच लाख ते दहा लाख रुपये एवढा असतो.
तुम्ही कोणत्या भागात जमीन घेताय यावरूनही शेतजमिनीचा भाव ठरतो. जास्त सुपिक जमीन असेल तर त्या जमिनीची किंमत जास्त असते. दळणवळणाची व्यवस्था लक्षात घेऊनही अमेरितेली शेतजमिनीचा भाव वाढतो किंवा कमी होतो.