Train Wheels : रेल्वेचे चाक कधी खराब होते, दोन चाकांची किंमत किती? आकडा वाचून चकित व्हाल!

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून चाकांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते. या प्रक्रियेत चाकांचा आकार, जाडी आणि झीज तपासली जाते.

| Updated on: Oct 25, 2026 | 10:35 PM
1 / 5
भारतात रोज कोट्यवधी लोक ट्रेनने प्रवास करतात. विशेष म्हणजे रेल्वे अपघाताची प्रकरण फारच दुर्मिळ आहेत. त्यामुळेच रेल्वेतील प्रवास हा सुरक्षित मानला जातो. याच सुरक्षित रेल्वे प्रवासात रेल्वेची लोखंडी चाकं महत्त्वाची भूमिका बजावतात. कित्येक वर्षे फिरत असूनही कोणताही अपघात न होऊ देता रेल्वेला धावतं ठेवण्याचं काम करतात.

2 / 5

परंतु रेल्वेची चाकं नेमकं कधी झिजतात, ते कधी बदलावे लागतात, याची अनेकांना कल्पना आहे. सोबतच रेल्वेच्या दोन चाकांची किंमत किती हेही अनेकांना माहिती नाही. याबाबतच सविस्तर जाणून घेऊ या..

3 / 5

साधारणपणे ट्रेनच्या चाकांचे आयुष्य साधारण 4 ते 6 वर्षे असू शकते. या काळात चाके अंदाजे 12 ते 15 लाख किलोमीटरचा प्रवास करू शकतात. मात्र, चाकांचे आयुष्य ट्रेनचा वेग, वजन, रेल्वेमार्गाची स्थिती आणि वाहतूक यांवर अवलंबून असते.

4 / 5

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून चाकांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते. या प्रक्रियेत चाकांचा आकार, जाडी आणि झीज तपासली जाते. चाकांवर किरकोळ झीज झाल्यास ती लगेच बदलण्याऐवजी री-प्रोफाइलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.

5 / 5

ट्रेनच्य एका चाकाची किंमत 70 ते 80 हजार रुपये गृहीत असते, असे सांगितले जाते. ही किंमत गृहित धरल्यास दोन चाकांसाठी सुमारे 1.40 ते 1.60 लाख रुपये खर्च येऊ शकतो. मात्र, चाकांची जोडी आणि संपूर्ण व्हीलसेट यांमध्ये फरक असतो. व्हीलसेटमध्ये दोन चाकांसोबत त्यांना जोडणारा अ‍ॅक्सलही असतो. एका चाकाची किंमत 70 हजार रुपये धरल्यास, आठ चाकांसाठी सुमारे 6.60. लाख रुपये खर्च येतो. 18 ते 22 डब्यांच्या एक्स्प्रेस ट्रेनमधील चाकांचा एकत्रित खर्च आणखी वाढतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us