
मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठी प्रगती केली आहे. त्याने आतार्यंत शस्त्रं, अस्त्रं तयार केली. आता हेच शस्त्र माणव तसेच प्राणीजगतासाठी धोका ठरत आहे. जगात अणुबॉम्ब तयार करण्यासाठी युरेनियम या मूलद्रव्याचा वापर केला जातो. याच यूरेनियमच्या जोरावर आज अमेरिका, रशिया, भारत तसेच पाकिस्तानसारख्या देशाकडे अणुबॉम्ब आहेत.

युरेनियम हे मूलद्रव्य एवढे घातक आहे, की त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास संपूर्ण पृथ्वीच नष्ट होण्याची भीती आहे. याच एका कारणामुळे संपूर्ण जग या यूरेनियमला एका प्रकारे घाबरते.

युरेनियममधून अतिशय मोठ्या प्रमाणात उर्जा बाहेर पडते. याच कारणामुळे त्याचा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापर केला जातो. अणुऊर्जा प्रकल्पांतही त्याचा उर्जानिर्मिती करण्यासाठी वापर होतो.

युरेनियमचा स्फोट घडवून आणल्यास मोठी उर्जा बाहेर पडते त्यामुळे हजारो लोकांचा एका क्षणात मृत्यू होऊ शकतो. युरेनियममधून घातक रेडियशन्स बाहेर पडतात. या रेडियेशन्शमुळे अनेक गंभीर आजार होतात. एकदा का युरेनियमचा स्फोट झाला की पुढच्या कित्येक वर्षांपर्यंत हवेत रेडियशन्स राहतात. यामुळे येणाऱ्या कित्येक पिढ्या या लुळ्या, अंपग म्हणून जन्माला येतात.

मोठ्या प्रमाणात युरेनियमचा स्फोट केला किंवा अनेक अणुबॉम्बचे स्फोट घडवून आणले तर संपूर्ण मानवजात तसेच प्राणी, पक्षी, वृक्ष नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळेच या युरेनियमचा जपून वापर करायला हवा, असे म्हटले जाते.