
चिकन बिर्याणी : रात्रीच्या वेळी बिर्याणी ही भारतीयांची सर्वात मोठी पसंती आहे. Swiggy च्या मते, चिकन बिर्याणी ही 24 तास ऑर्डर केली जाणारी 'सुपरस्टार' डिश आहे. रात्रीच्या वेळी हजारो लोक बिर्याणीलाच प्राधान्य देतात.

चिकन बर्गर : अनेक रिपोर्ट्सनुसार, मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत चिकन बर्गर हा सर्वात जास्त ऑर्डर केला जाणारा पदार्थ ठरला आहे. 2024 मध्ये मध्यरात्रीच्या वेळी 18 लाखांहून अधिक बर्गरची ऑर्डर देण्यात आली होती.

पिझ्झा : तरुण पिढीमध्ये रात्री उशिरा पिझ्झा ऑर्डर करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. विशेषतः विकेंडच्या रात्री पिझ्झाच्या ऑर्डरमध्ये 3 पटीने वाढ होते.

नूडल्स आणि चायनीज फूड : रात्रीच्या वेळी झटपट आणि चवदार पर्याय म्हणून लोक नूडल्स आणि फ्राइड राईसची मोठ्या प्रमाणावर ऑर्डर करतात. तसेच रात्री जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक आईस्क्रीमला पसंती देतात.

इमर्जन्सी आयटम्स : रात्रीच्या वेळी लोक कंडोम आणि सॅनिटरी पॅड्स यांसारख्या वैयक्तिक वस्तूही ऑर्डर करतात. दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी या पदार्थांची मागणी वाढते.