
कोल्ड्रिंक्स मुलांचे आवडते पेय आहे. अनेकदा ते वडिलांकडे कोल्ड्रिंक्स पिण्याचा हट्ट करतात. परंतु कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढतो. दात किडतात. तसेच इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

एकतर तुमच्या मुलांसाठी फास्ट फूड मर्यादित करा किंवा त्यांचे सेवन पूर्णपणे बंद करा. कारण त्यात जास्त प्रमाणात आरोग्यास हानीकारक असणारे फॅट्स, सोडियम आणि साखर असते. ज्यामुळे मुलांच्या आरोग्याला वाईट परिणाम होतो.

चिप्स, बिस्किट आणि अनेक प्रकारच्या स्नॅक्सची चव मुलांना खूप आकर्षित करते. परंतु या गोष्टी आपल्या मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. कारण त्यामध्ये भरपूर फॅट, सोडियम आणि कृत्रिम घटक असतात. ते मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.

शूगर कँडी ही मुलांना आवडते. परंतु पालकांनी या सवयीवर नियंत्रण ठेवावे. कारण यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच दात किडण्यासाठी शूगर कँडी जबाबदार आहे.

मुलांना रोजच्या न्याहारीसाठी व्हाईट ब्रेड किंवा त्यापासून बनवलेले सँडविच आवडते. सँडविच जास्त काळ ताजे राहण्यासाठी मीठ टाकले जाते. उच्च सोडियम आहार मुलांसाठी चांगला नाही. त्याऐवजी संपूर्ण धान्य ब्रेड त्याला द्या.