हा आजार झाला की मृत्यू अटळ, तडफडून जातो जीव; वेळीच घ्या काळजी अन्यथा…

हा आजार एकदा जडला की रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. त्यामुळेच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यात थोडी जरी चूक झाली तर मात्र डॉक्टर काहीही करू शकत नाहीत.

| Updated on: Jul 08, 2025 | 6:10 PM
1 / 7
नुकतेच ब्रिजेश सोळंकी नावाच्या 22 वर्षीय कबड्डीपटूचा रेबीजने मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील कुत्र्‍याच्या पिल्लाला त्याने वाचवलं होतं. तोच कुत्रा चावल्याने त्याला रेबीजची लागण झाली होती. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नुकतेच ब्रिजेश सोळंकी नावाच्या 22 वर्षीय कबड्डीपटूचा रेबीजने मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील कुत्र्‍याच्या पिल्लाला त्याने वाचवलं होतं. तोच कुत्रा चावल्याने त्याला रेबीजची लागण झाली होती. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 7

रेबीज हा एक घातक असा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. प्राण्याने चावा घेतल्यानंतर किंवा प्राण्याच्या लाळेशी संपर्क आल्यास रेबीज आजाराची लागण होते. कुत्रा, मांजर, माकड तसेच अन्य जंगली प्राण्यांनी चावा घेतल्यास हा आजार होतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 7

रेबीज विषाणूची लागण झाल्यास तो थेट मेंदूवर हल्ला करतो. या आजाराची लक्षणं काही आठवडे ते काही महिन्यांत दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 7

या आजाराची लागण झाली तर ताप, डोकेदुखी, थकवा, चावा घेतलेल्या जागेवर खाज येणे आग होणे, घशात खाज येणे, मळमळ, उलटी अशी सुरुवातीला लक्षणं दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 7

रेबीजच्या विषाणूने न्यूरॉन्सवर हल्ला करण्यास चालू केल्यानंतर अस्वस्थता, हॅल्यूसिनेशन्स, हायड्रोफोबिया, लाळ गळणे, अन्न गिळायला अडचण येणे, आक्रमकता, कोमामध्ये जाणे, पॅरालिसीस अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 7

एकदा रेबीज विषाणूची लागण झाली की रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. कारण प्रतिबंध म्हणून रेबिजच्या लसीची निर्मिती करण्यात आलेली आहे. पण ही लस घेतलेली नसताना रेबिजच्या विषाणूची लागण झाल्यास त्यावर कोणताही उपचार नाही.

7 / 7

हळूहळू रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे प्राण्यांनी चावा घेतल्यास आणि त्याला रेबिजची लागण झाल्यास मृत्यू अटळ असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us