
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक पातळीवर घडत असेलल्या घडामोडी आणि आपल्या देशाचे धोरण तसेच इतर काही गोष्टींचा परिणाम म्हणून सोन्याचा भाव वाढताना दिसत आहे.

सोन्यासोबतच चांदीचा भावही वाढताना दिसतोय. चालू वर्षात सोन्याचा भाव तब्बल 40 टक्क्यांनी वाढला आहे. आगामी काळातही सोन्यामध्ये अशीच तेजी दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत आगामी पाच वर्षात सोन्याचा भाव किती असेल? असा प्रश्न विचारला जातोय.

सोन्याची सध्याची घोडदौड लक्षात घेता पुढच्या पाच वर्षांत सोन्याचा भाव थेट दुप्पट म्हणजेच दोन लाखांवर जाणार का? असे विचारले जात आहे. या प्रश्नाचे उत्तर काही तज्ज्ञांनी दिले आहे. आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स लिमिटेडचे एव्हीपी (कमोडिटिज अँड करेसिंज) मनिष शर्मा यांनी सांगितल्यानुसार सोन्याचा भाव एका गोष्टीवर अवलंबून असेल.

आगामी पाच वर्षात भू-राजकीय स्थिती कशी असेल यावर सोन्याचा भाव ठरेल असे मनिष शर्मा यांनी सांगितले आहे. तसेच मनिष शर्मा यांच्यानुसार 1 वर्षात सोन्याचा भाव 1.20 लाख रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 5 वर्षांत सोन्याचा भाव 1.7 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतो.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)