फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे किती वेळाने बदलावा? कोणता आईस ट्रे सर्वात उत्तम? जाणून घ्या

तुमच्या फ्रीजमधील बर्फाचा ट्रे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तो किती दिवसांनी बदलावा आणि स्वच्छतेचे नियम काय आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती या बातमीतून जाणून घ्या.

| Updated on: Feb 02, 2026 | 3:50 PM
1 / 6
उन्हाळा असो किंवा थंड पेयांचा आस्वाद घ्यायचा असो, आपण फ्रीजमधील बर्फाचा सर्रास वापर करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या ट्रेमध्ये हा बर्फ तयार होतो, तो किती जुना आहे? अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे तोच प्लास्टिकचा ट्रे वापरला जातो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

उन्हाळा असो किंवा थंड पेयांचा आस्वाद घ्यायचा असो, आपण फ्रीजमधील बर्फाचा सर्रास वापर करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या ट्रेमध्ये हा बर्फ तयार होतो, तो किती जुना आहे? अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे तोच प्लास्टिकचा ट्रे वापरला जातो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

2 / 6

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बर्फाच्या ट्रेची देखील एक एक्सपायरी डेट असते. प्लास्टिकच्या ट्रेवर कालांतराने बारीक ओरखडे पडतात. या ओरखड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि ओलावा साचून राहतो, जो साध्या धुण्याने निघत नाही.

3 / 6

तसेच, जुन्या प्लास्टिकमधून रसायने (BPA) पाण्यात उतरण्याची शक्यता असते. जर तुमच्या बर्फाला फ्रीजमधील इतर पदार्थांचा वास येत असेल, तर समजावे की ट्रे बदलण्याची वेळ आली आहे. प्लास्टिक ट्रे हा साधारणपणे ६ ते १२ महिन्यांत बदलणे आरोग्यासाठी हिताचे आहे.

4 / 6

सिलिकॉन ट्रे हे जास्त काळ टिकतात. तथापि, २ वर्षांनंतर किंवा सिलिकॉन सैल पडू लागल्यास ते बदलणे योग्य ठरते. स्टील ट्रे हे सर्वात सुरक्षित मानले जातात. जोपर्यंत त्यांना गंज लागत नाही किंवा ते वाकत नाहीत, तोपर्यंत ते वापरता येतात.

5 / 6

प्रत्येक वेळी बर्फ काढल्यानंतर ट्रे कोमट पाण्याने आणि सौम्य साबणाने धुवावा. महिन्यातून एकदा १ कप पाणी आणि २ चमचे बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर यांचे मिश्रण करून ट्रे घासल्याने त्यातील पांढरे डाग आणि दुर्गंधी निघून जाते.

6 / 6

तसेच कोणताही धुवून झाल्यावर ट्रे पूर्णपणे कोरडा करूनच पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा. शक्य असल्यास झाकण असलेले ट्रे वापरा. यामुळे बाहेरील हवा आणि इतर पदार्थांचा वास बर्फाला लागत नाही आणि बर्फ अधिक शुद्ध राहतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us