
माशांची अंडी हाडे मजबूत करण्यास उपयोगी पडतात. या माशांच्या अंड्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे घटक हाडे मजबूत करतात.

बदकाची अंडी खाल्ली जातात हे तुम्हाला माहितेय का? बदकाच्या अंड्यामध्ये लोह, व्हिटॅमिन डी, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतात.

टर्कीची अंडी, तुम्ही ऐकून असाल की टर्की अंडी खाल्ली जातात. या अंड्यांमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतं आणि यात कोलेस्ट्रॉल देखील कमी असतं.

व्हिटॅमिन बी 12, लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे सर्व पोषक घटक हंसाच्या अंड्यामध्ये असतात. या अंड्याचं सेवन आरोग्यासाठी उत्तम आहे.

इमू अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ही अंडी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, लोह आणि फॉलिक ॲसिड चांगल्या, भरपूर प्रमाणात असतं असं म्हणायला हरकत नाही.